बेळगाव येथील श्री बसवेश्वर को-ऑपरेटिव्ह बँक लि. च्या अध्यक्षपदी सरला हेरेकर यांची निवड झाली आहे.

बेळगाव येथील श्री बसवेश्वर को-ऑपरेटिव्ह बँक लि. च्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी २४ जुलै रोजी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत समाजसेविका व माजी नगरसेविका सरला हेरेकर यांची उर्वरित कालावधीसाठी बहुमताने निवड करण्यात आली.

निवडणुकीनंतर बोलताना नवनिर्वाचित अध्यक्षा सरला हेरेकर यांनी बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली. संचालक मंडळातील सर्व सदस्यांच्या सहकार्याने पारदर्शक कारभार केला जाईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
या वेळी बँकेचे उपाध्यक्ष सचिन शिवण्णावर, संचालक विजयकुमार अंगडी, रमेश कळसण्णावर, रमेश सिद्दण्णावर, बसवराज उप्पीन, गिरीश बागी, सतीश पाटील, बालचंद्र बागी, जगदीश खडबडी, पूजा हुक्केरी, निखिल झोंड, भारती कग्गणगी, दयानंद बाळेकुंद्री, सुभाष कत्ती, राजीव काळेनट्टी, चंद्रकांत कट्टीमणी, सरव्यवस्थापक व्ही. व्ही. अंटीण आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता.


Recent Comments