Belagavi

बेळगावातील गणेशोत्सवासाठी महामंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Share

गणेशोत्सव सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर बेळगाव मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या या उत्सवाच्या नियोजनासाठी महामंडळाने १५ महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये गणेश मंडळांना परवानगी मिळण्यासाठी जुनी महापालिका इमारत, गोवावेस वृत्त आणि ८ पोलीस ठाण्यांच्या व्याप्तीत एक खिडकी पद्धत लागू करावी, पेव्हर ब्लॉक वापरून खड्डे पडलेले रस्ते दुरुस्त करावेत, स्वच्छता राखावी आणि मिरवणूक मार्गावर पुरेशी प्रकाशयोजना करावी, या मुद्द्यांचा समावेश आहे.

याशिवाय तात्पुरत्या मोबाईल शौचालयांची सोय, रात्रीच्या वेळी बस सेवा, सार्वजनिक प्रेक्षक गॅलरीची उभारणी आणि हेस्कॉमच्या तात्पुरत्या वीज जोडणी नियमांत शिथिलता देण्याची मागणी करण्यात आली.

या वेळी महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, उपाध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, सचिव आनंद आपटेकर, जनसंपर्क अधिकारी विकास कलघटगी, महादेव पाटील, सागर पाटील, प्रसाद मरगाळे, सुनील बोकडे, दुर्गाप्रसाद जोशी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: