बेळगाव येथील एस. जी. बाळेकुंद्री अभियांत्रिकी महाविद्यालयात २५ जुलै रोजी राज्यस्तरीय ‘कैवल्य पद्धती’ काव्य-गायन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

नागनूर रुद्राक्षिमठाचे डॉ. अल्लमप्रभू स्वामीजी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. कन्नड आणि संस्कृती खाते, कर्नाटक संगीत नृत्य अकादमी तसेच नागनूर रुद्राक्षिमठाचे एस. जी. बाळेकुंद्री अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मन्निजगुरू शिवयोगी रचित ‘कैवल्य पद्धती’वर आधारित या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अकादमीचे सदस्य एम. कासीम मल्लिगेमडुवू यांनी दिली.

हा सोहळा २५ जुलै रोजी सकाळी ९ वाजता महाविद्यालयाच्या शिवकुमार संबरगीमठ सभागृहात पार पडणार आहे. या सोहळ्याला तोंटद सिद्धराम स्वामीजींचे सानिध्य लाभणार असून, कर्नाटक संगीत नृत्य अकादमीच्या अध्यक्षा शुभा धनंजय या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
या राज्यस्तरीय सोहळ्याला कागिनेले विकास प्राधिकरणाचे आयुक्त मुक्कण्ण करिगार, एस. जी. बाळेकुंद्री महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. आर. पटगुंदी आणि अकादमीचे रजिस्ट्रार एन. नरेंद्र बाबू यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


Recent Comments