दक्षिण कर्नाटकातील मंदिरांच्या धर्तीवर उत्तर कर्नाटकातील मंदिरांचाही स्वच्छता, शिस्तबद्ध पूजा पद्धत आणि भक्तसेवेच्या माध्यमातून विकास केला पाहिजे, असे प्रतिपादन कुंचिटीगर संस्थान मठाचे जगद्गुरू श्री हनुमंतनाथ महास्वामीजी यांनी केले.


कर्नाटक देवालय संवर्धन समिती आणि श्री गुरुशांतेश्वर जनकल्याण प्रतिष्ठान (हिरेमठ-हुक्केरी) यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव येथील लक्ष्मी टेकडी येथील श्री हिरेमठ येथे २१ जुलै ते २८ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या आठ दिवसांच्या अर्चक प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.


या कार्यक्रमास कारंजी मठाचे परमपूज्य श्री गुरुसिद्ध महास्वामीजी यांनी दिव्य सानिध्य लाभून आशीर्वाद दिले. तर मुख्य वक्ते म्हणून श्री मनोहर मठजी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेतृत्व पूज्य श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले. बेळगाव जिल्ह्यातील विविध समाजातील अर्चकांना एकाच व्यासपीठावर आणून हे प्रशिक्षण शिबिर यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.
या शिबिराचे उद्घाटन नगर संघचालक बाळण्णा कग्गणगी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला उद्योजक पी. एस. हिरेमठ, डॉ. एम. बी. बेल्लद आणि डॉ. केदारेश्वर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments