बेळगावातील टिळकवाडी येथील प्रसिद्ध ‘बीएससी टेक्स्टाईल मॉल’ने यशस्वी ४ वर्षे पूर्ण करून ५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. या शुभप्रसंगानिमित्त मॉलने ग्राहकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. आषाढ, श्रावण आणि आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर २६ जुलैपासून ‘१० अधिक १०’ टक्के ‘डबल डिस्काउंट’ ऑफर सुरू करण्यात येत असल्याची माहिती विपणन व्यवस्थापक ईरण्णा शिवशेट्टी यांनी दिली.

आज बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत विपणन व्यवस्थापक ईरण्णा शिवशेट्टी बोलत होते. बेळगावमधील टिळकवाडी येथील ‘बीएससी टेक्स्टाईल मॉल’ ग्राहकांसाठी दरवर्षी देणारी बहुप्रतिक्षित ‘डबल डिस्काउंट’ ऑफर २६ जुलैपासून सुरू करत आहे. संस्थेने बेळगावात यशस्वी ४ वर्षे पूर्ण करून ५ व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल, तसेच यंदाच्या आषाढ आणि श्रावण महिन्यांतील सणांचे औचित्य साधून ही ऑफर जाहीर करण्यात आली आहे. वर्षभर दिल्या जाणाऱ्या १० टक्के सवलतीव्यतिरिक्त अतिरिक्त १० टक्के सूट मिळून एकूण ‘१० अधिक १०’ टक्के असा डबल डिस्काउंट मिळणार आहे. आगामी गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळीच्या खरेदीसाठी सोयीचे व्हावे म्हणून ही ऑफर महिनाभर उपलब्ध असणार आहे. बेळगाव जिल्ह्यासह शेजारील महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील ग्राहकांनी या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेत केले.

श्रावण महिना तसेच आगामी गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळीनिमित्त २६ जुलैपासून ‘डबल डिस्काउंट’ ऑफर सुरू होत असल्याचे स्टोअर मॅनेजर अमजद जमादार यांनी सांगितले. बीएससी मॉल जुन्या कपड्यांचा स्टॉक खाली न करता, ग्राहकांसाठी नव्याने आलेल्या अगदी नवीन वस्त्रसाठ्यावर नेहमीच्या १० टक्के सवलतीसोबतच अतिरिक्त १० टक्के अशी ‘डबल डिस्काउंट’ सवलत देत आहे. बेळगाव, महाराष्ट्र आणि गोव्यातून येणाऱ्या ग्राहकांसाठी विशेष काउंटर्ससह अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तसेच ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात मॉलच्या आवारात बीएससीचे स्वतःचे रेस्टॉरंटही सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.


Recent Comments