Belagavi

बेळगावात बीएसएनएल कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

Share

दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी बेळगावमध्ये बीएसएनएल (BSNL) कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी तीव्र धरणे आंदोलन छेडले आहे.

९ वर्षांपासून रखडलेली वेतनवाढ, पेन्शन दुरुस्ती आणि पूर्ण क्षमतेने ४जी सेवा सुरू करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

मागण्या मान्य न झाल्यास येत्या ७ ऑगस्ट रोजी दिल्लीतील संसद भवनाला घेराव घालण्याचा इशारा कर्मचारी संघटनेचे नेते अरविंद चौगुले आणि रामू तटपटी यांनी दिला आहे.

खाजगी कंपन्यांप्रमाणे बीएसएनएललाही आधुनिक उपकरणे खरेदीची परवानगी मिळावी आणि सरकारने कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. या धरणे आंदोलनात बीएसएनएलचे अनेक कर्मचारी व पेन्शनधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: