Belagavi

पंतप्रधान आवास योजनेतील १३०० घरे काँग्रेस सरकारकडून रद्द

Share

बेळगाव दक्षिण मतदारसंघातील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गरिबांसाठी मंजूर झालेली १३०० हून अधिक घरे सध्याच्या काँग्रेस सरकारने रद्द केली आहेत, असा गंभीर आरोप भाजपा नेते व आमदार अभय पाटील यांनी केला आहे.

भाजपाच्या सत्ताकाळात बेळगाव दक्षिण मतदारसंघात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत एकूण १७४८ घरे मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी सुमारे ४५० घरांचे बांधकाम प्रगतीपथावर होते. मात्र, काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर उरलेली १३०० घरे पूर्णपणे रद्द करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

दरवर्षी या योजनेअंतर्गत साधारण १५०० घरे मंजूर होणे अपेक्षित होते. त्यानुसार गेल्या ४ वर्षांत सुमारे ४५०० घरे मिळायला हवी होती. परंतु, काँग्रेस सरकारने नवीन घरे तर दिलीच नाहीत, उलट आधीची मंजूर घरे रद्द करून गरिबांचा हक्क हिरावून घेतला, अशी टीका आमदार अभय पाटील यांनी केली.

Tags: