Belagavi

बेळगावात रंगणार २७ वा कारगिल विजयोत्सव

Share

अखिल कर्नाटक माजी सैनिक संघाच्या वतीने २६ जुलै रोजी बेळगावातील नेहरू नगर येथील केपीटीसीएल सभागृहात सत्ताविसावा कारगिल आणि ऑपरेशन सिंधूर विजयोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

या सोहळ्यात हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबीयांचा आणि निवृत्त जवानांचा गौरव केला जाईल असे अध्यक्ष बसप्पा तळवार यांनी सांगितले कार्यक्रमादरम्यान अंध आणि अनाथ मुलांना प्रोत्साहनपर आर्थिक मदत दिली जाणार आहे तसेच कारगिल युद्धातील हुतात्मा सैनिकांच्या वारसांना आणि माजी सैनिकांना जनरल करिअप्पा व सैनिक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे

या सोहळ्याचे उद्घाटन पालकमंत्री सतीश जारकीहोळी करणार असून मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व लष्करी अधिकारी उपस्थित राहतील वीर जवानांच्या स्मरणासाठी नागरिकांनी व तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संघाने केले आहे

या वेळी डॉ शिवन्ना एस, के एन कळसण्णावर, शंकर हर्जे, अडिकेप्पा मनगुत्ती आणि आशाराणी वन्नूर आदी उपस्थित होते

Tags: