अतिरिक्त उपमुख्यमंत्री पदाबाबत पक्षात चर्चा सुरू असून, पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल, असे स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिले.

नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, अतिरिक्त उपमुख्यमंत्री पदे निर्माण करणे हा पूर्णपणे काँग्रेस हायकमांडचा निर्णय आहे. मी स्वतः उपमुख्यमंत्री पदाची कोणतीही मागणी केलेली नाही; परंतु हा पक्षाचा धोरणात्मक निर्णय असून पक्ष जो निर्णय घेईल त्या निर्णयाशी मी बांधील असेल, असे विधान सतीश जारकीहोळी यांनी केले.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना ते म्हणाले की, हायकमांडचे वरिष्ठ नेते सध्या ‘नीट’ गैरव्यवहाराविरोधातील आंदोलनात व्यस्त आहेत. देशाच्या दृष्टीने हे आंदोलन अत्यंत महत्त्वाचे असल्याने काल मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बैठक होऊ शकली नाही. आता शनिवारी किंवा रविवारी पक्षाचे वरिष्ठ नेते पुन्हा बैठकीसाठी बोलावू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.


Recent Comments