खानापूर तालुक्यातील कक्केरी गावात शेतातील तळ्यात तोल जाऊन पडल्याने एका ५२ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कक्केरी येथील रहिवासी मल्लय्या दुंडय्या हिरेमठ हे शेतातील तळ्याच्या कडेचे गवत काढत असताना त्यांचा पाय घसरून ते पाण्यात पडले. पोहता येत नसल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच नंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविकुमार धर्मट्टी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी नंदगड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.


Recent Comments