बेळगावातील आश्रय कॉलनी येथे गृहज्योती योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्यासाठी पुनर्तपासणी अभियानाचा प्रारंभ करण्यात आला


महानगरपालिका नियुक्त सदस्य मुश्ताक मुल्ला यांनी अभियानाचा प्रारंभ केला हेस्कॉम कर्मचारी घरोघरी जाऊन ओळखपत्र, वीज बिल आणि छायाचित्र गोळा करून नोंदणी पूर्ण करतील असे त्यांनी सांगितले


लाभार्थ्यांनी घाबरून न जाता कर्मचाऱ्यांना आवश्यक कागदपत्रे देऊन सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले कागदपत्रे न दिल्यास योजनेच्या लाभावर परिणाम होऊ शकतो

हेस्कॉम अधिकारी डी. व्ही. अंदिगुंदी यांनी बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या सूचनेनुसार ग्रामीण व शहरी भागात ही तपासणी सुरू असल्याचे सांगितले
लाभार्थ्यांनी मतदार ओळखपत्र, वीज बिल आणि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत पुढील टप्प्यातही हे अभियान सुरू राहणार असून नागरिकांनी पूर्ण सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले
या वेळी संगीता संगडी, कल्लप्पा, सैयदा यांच्यासह स्थानिक नेते, हेस्कॉम कर्मचारी व नागरिक उपस्थित होते


Recent Comments