बेळगाव जिल्ह्यातील करजगा येथील एका महिलेच्या तक्रारीवरून अवैध सावकारी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी फरार असलेला आरोपी सदानंद भीमराव हलगे (वय ४७) याला संकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे.

तक्रारदार महिलेने कर्जाची मुद्दल आणि व्याज मिळून ३६.७७ लाख रुपये परत केल्यानंतरही आरोपीने आणखी ४.६४ लाख रुपयांची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिली होती.

२२ जुलै रोजी कणगला गावाजवळून पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, संकेश्वर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Recent Comments