क्रांती महिला मंडळाच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त हिंदवाडी येथे ‘गान नाट्य संभ्रम’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


प्रमुख कर सल्लागार जितेश कब्बूर यांनी दीपप्रज्वलन करून या महोत्सवाचे उद्घाटन केले. या प्रसंगी मंडळाच्या दोन दशकांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेणाऱ्या स्मरणिकेचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. जितेश कब्बूर यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक करत रौप्य महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या. मंडळाच्या अध्यक्षा मंगला मठद यांनी उपस्थितांचे स्वागत केले, उपाध्यक्ष त्रिशिला पायप्पनावर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली तर सचिव भारती रत्नगोळ यांनी प्रास्ताविक केले. ममता अंटीन आणि रत्नश्री गुडेर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.


प्रेमा उपाध्याय यांच्या गणेशवंदनेने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. उमा संगीत प्रतिष्ठानच्या विद्यार्थिनींनी साबण्णावर आणि अशोक कट्टी यांच्या संगीत संयोजनातून गीतगायन तर वाणी हेरेकर आणि रेश्मा दिवटे सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. या सोहळ्याला आर्ष आश्रमातील मुले व मंडळाच्या सदस्या उपस्थित होत्या. अक्षता पाटील व दीप्ती कागवाड यांनी सूत्रसंचालन तर गीता यम्मी यांनी आभार मानले.



Recent Comments