मॅट्रिकोत्तर शासकीय मुलींच्या वसतीगृहात वॉर्डन आणि स्वयंपाक साहाय्यकाकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप करत विजापुरातील डॉ. बी. आर. आंबेडकर वसतीगृहाच्या विद्यार्थिनींनी आंदोलन केले.


विजापूर जिल्ह्यातील बसवन बागेवाडी येथील डॉ. बी. आर. आंबेडकर वसतीगृहात कर्मचाऱ्यांकडून विनाकारण मानसिक त्रास दिला जात असल्याचे सांगत विद्यार्थिनींनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.

आंदोलनाची माहिती मिळताच समाज कल्याण विभागाचे उपसंचालक महेश पोतदार यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन विद्यार्थिनींची बाजू ऐकून घेतली. दोषींवर कडक शिस्तभंगविषयक कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर विद्यार्थिनींनी आपले आंदोलन मागे घेतले.


Recent Comments