DEATH

संजय रमेशराव देसाई यांचे निधन

Share

इदलहोंड (ता. खानापूर ) गावचे सुपूत्र संजय रमेश देसाई (५०) यांचे शनिवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. खानापूरचे माजी ता. पं. सदस्य रमेश देसाई यांचे ते चिरंजीव होत. रक्षाविसर्जन सोमवारी (दि.20) रोजी सकाळी 8 वा. होणार आहे.

शनिवारी इदलहोंड स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील, माजी आमदार अरविंद पाटील, महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, सचिव आबासाहेब दळवी, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, प्रकाश चव्हाण, राजाराम देसाई, माजी जि. पं. सदस्य बाबुराव देसाई आदी उपस्थित होते.

Tags: