Belagavi

फॅक्टरीच्या दूषित पाण्यामुळे शेकडो जनावरांचा मृत्यू; बेळगावात तीव्र निदर्शने

Share

‘क्वालिटी ॲनिमल फीड्स’ फॅक्टरीच्या दुर्गंधीमुळे आणि दूषित पाण्यामुळे नागरिक त्रस्त असून, करुणाड रक्षण वेदिकेच्या वतीने गुरुवारी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागातील निंग्यानट्टी, कुरीहाळ आणि इद्दलहोंड गावांजवळ ही फॅक्टरी आहे. फॅक्टरीमधून येणाऱ्या दुर्गंधीमुळे शाळकरी मुले, महिला आणि वृद्धांचे आरोग्य धोक्यात आले असून, मुले शाळेत जाण्यासही नकार देत आहेत.

फॅक्टरीतील दूषित रसायनयुक्त पाणी जवळच असलेल्या नदीत सोडले जात आहे. हे विषारी पाणी पिल्याने परिसरातील सुमारे १०० ते ११० जनावरांचा मृत्यू झाला असून अनेक जनावरे आजारी पडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने या गंभीर प्रकाराची त्वरित दखल घेऊन फॅक्टरीवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा करुणाड रक्षण वेदिकेने दिला आहे.

Tags: