अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल तरुण आणि विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी कर्नाटक सरकारच्या मोहिमेचा एक भाग म्हणून बेळगाव उत्तर परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांमध्ये ‘ऑपरेशन राईज’ आणि एक विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे तरुणांना ड्रग्जच्या विळख्यातून दूर ठेवण्यासाठी विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत.

विजापूर येथील जिल्हा पोलीस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उत्तर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी ही माहिती दिली.

शाळा-कॉलेजमधील विद्यार्थी, तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये अमली पदार्थांविरुद्ध जनजागृती करण्यासाठी हा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला असून, बेळगाव उत्तर परिक्षेत्राच्या कार्यक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांमध्ये याची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असे संदीप पाटील यांनी सांगितले.
या मोहिमेत पोलीस विभाग, शैक्षणिक संस्था आणि विविध सामाजिक संघटनांच्या सहभागाने जनजागृतीपर कार्यक्रम, थेट संवाद आणि ड्रग्जविरोधी शपथ घेण्यासह विविध उपक्रम राबवले जाणार आहेत, अशी माहिती संदीप पाटील यांनी दिली. या पत्रकार परिषदेला विजापूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी उपस्थित होते.


Recent Comments