Belagavi

शरीरसौष्ठव स्पर्धेतील विजेत्यांचा मराठा बँकेकडून भव्य सत्कार

Share

भूतानमध्ये पार पडलेल्या दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगावच्या प्रतिभावान खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावची प्रसिद्ध संस्था असलेल्या मराठा को-ऑप बँकेच्या वतीने या विजेत्या खेळाडूंचा जाहीर सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले.

भूतानमधील दक्षिण आशियाई शरीरसौष्ठವ स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारे प्रताप कालकुंद्रीकर, रौप्यपदक विजेते प्रशांत खन्नूकर आणि कांस्यपदक विजेत्या केतकी पाटील यांच्यासाठी मराठा को-ऑप बँकेने सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. बँकेचे अध्यक्ष बाळाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात सर्व विजेत्यांना शाल आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. बँकेचे जनरल मॅनेजर संतोष धामणेकर यांनी प्रास्ताविक केले, तर व्हाईस चेअरमन शेखर हंडे यांनी आभार मानले. या प्रसंगी बँकेचे संचालक दिगंबर पवार, रेणू किल्लेकर, दीपाली दळवी यांच्यासह अनेक मान्यवर आणि बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.

Tags: