चित्रपटातील कथेलाही मागे टाकेल असा या प्रेमी युगुलाचा संघर्ष समोर आला आहे. तब्बल नऊ वर्षांचे प्रेम, कुटुंबीयांचा विरोध आणि तीन वर्षांच्या छळानंतर अखेर हे जोडपे एकत्र आले आहे. मात्र, मुलीच्या कुटुंबाकडून जिवाला धोका असल्याने या प्रेमी युगुलाने संरक्षणासाठी बेळगाव पोलीस अधीक्षकांची भेट घेतली.

कन्नड भाषिक तरुण रोहन पुजारी आणि मराठी तरुणी ईशा शेटकर यांची ही प्रेमकथा असून तीन वर्षांपूर्वीच त्यांनी बेळगावच्या दत्त मंदिरात विवाह केला होता. शालेय जीवनापासून सुरू झालेल्या या प्रेमाला ईशाच्या श्रीमंत कुटुंबाचा तीव्र विरोध होता. साऊंड सिस्टीमच्या दुकानात काम करणाऱ्या रोहनला नाकारत मुलीच्या पालकांनी यापूर्वी गोव्यातील पणजी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती.

त्यावेळी पोलिसांसमोर लग्न लावून देण्याचे आश्वासन देऊन मुलीला घरी नेणाऱ्या पालकांनी तिला तीन वर्षे घरातच डांबून ठेवले होते. तिच्याकडून मोबाईल काढून घेत छळ करण्यात आला. मात्र, नुकतीच ईशाने रोहनशी संपर्क साधून घरातून पळ काढला. आता हे जोडपे कायदेशीररीत्या नोंदणीकृत विवाह करणार असून मुलीच्या प्रभावामुळे कुटुंबाला धोका असल्याने त्यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.


Recent Comments