Uncategorized

यमनापूरमध्ये येळ्ळूर-धामणे पायी दिंडीचे उत्साहात स्वागत

Share

येळ्ळूर-धामणे येथून निघालेल्या पायी दिंडीचे यमनापूर येथे आगमन झाले असून, ग्रामस्थांनी दिंडीचे आणि पालखीचे जल्लोषात स्वागत केले.

यमनापूर येथे पायी दिंडी दाखल झाल्यानंतर संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. गावातील महिला व ग्रामस्थांनी एकत्र येत दिंडीतील पालखीचे भक्तिभावाने पूजन केले आणि वारकऱ्यांचे स्वागत केले. या सोहळ्यामुळे यमनापूर परिसर टाळ-मृदंगाच्या गजराने आणि हरिनाम जयघोषाने भक्तीमय झाला होता.

दिंडीतील वारकऱ्यांच्या सुविधेसाठी आणि सेवेसाठी यमनापूर येथील प्रतिष्ठित नागरिक खाचू चन्नाप्पा पाटील आणि चंद्रकांत खाचू पाटील यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व वारकऱ्यांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी गावातील नागरिक, महिला आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: