खानापूर तालुक्यातील होन्नकल गावात दलित महिलांवर झालेल्या जातीवाचक शिवीगाळ आणि जीवघेण्या हल्ला प्रकरणी समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी बीम्समध्ये उपचार घेत असलेल्या जखमी महिलांची भेट घेऊन विचारपूस केली.


होन्नकल गावात दोन दलित महिलांवर प्राणघातक शस्त्रांनी हल्ला करून जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर आज समाजकल्याण विभागाचे संयुक्त संचालक रामनगौडा कण्णोळी आणि खानापूर तालुका सहाय्यक संचालक बसवराज चन्नवर यांनी बेळगाव जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी रुग्णालयात दाखल असलेल्या पीडित महिलांच्या प्रकृतीची विचारपूस करून घटनेची सविस्तर माहिती घेतली.

या भेटीदरम्यान दलित संघर्ष समन्वय समितीचे जिल्हा सरचिटणीस राजशेखर हिंडलगी, नेते राघवेंद्र चलवादी, मारुती कांबळे, नागप्पा मादर यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून पीडित महिलांना तातडीने आणि योग्य न्याय मिळवून देण्याची मागणी केली.


Recent Comments