Belagavi

‘पाही वाइब्स’च्या माध्यमातून बेनकनहळ्ळीत बहरली ५६० रोपे

Share

बेळगावजवळील बेनकनहळ्ळी येथील सरकारी मराठी शाळेत पाही वाइब्स फाउंडेशनतर्फे सुकलेल्या रोपांच्या जागी नवीन रोपे लावण्याची मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली.

बेळगावजवळील बेनकनहळ्ळी येथील सरकारी मराठी शाळेत ‘पाही वाइब्स फाउंडेशन’तर्फे सुकलेल्या रोपांच्या जागी नवीन रोपे लावण्याची मोहीम राबवण्यात आली. गेल्या वर्षी संस्थेने लावलेली ५६० रोपे उत्तम प्रकारे जगवून पर्यावरण संवर्धनाचा आदर्श घालून दिला आहे.

या मोहिमेचे मैदानी नेतृत्व विजय कानेरी, शिवानंद हिरेमठ, एच.ओ. कुमारस्वामी, किरण नरगुंदकर आणि महांतेश हिरेमठ यांनी केले. यावेळी गेल्या वर्षी लावलेल्या रोपांचे मनापासून संगोपन करणारे शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर पाटील यांच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले. निसर्गासाठी काम करताना आपण त्यात आनंद घेतला पाहिजे आणि लहान, सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच पर्यावरणावर सकारात्मक प्रभाव पडतो, अशी प्रतिक्रिया संस्थेच्या संस्थापक संचालिका रक्षा यु यांनी दिली.

या उपक्रमासाठी ‘युनिव्हर्सल नॉलेज ट्रस्ट’ने रोपे उपलब्ध करून दिली होती.

Tags: