गेल्या 4 दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव शहरातील शहापूर भागात असलेल्या सिद्धार्थ बोर्डिंगची संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली आहे.


शहापूर परिसरातील नाथ पै चौकाजवळ असलेल्या सिद्धार्थ बोर्डिंगची भिंत मुसळधार पावसामुळे अचानक कोसळली. या भिंतीचा पाया कमकुवत झाला होत्या, दरम्यान पावसाचे पाणी भिंतींमधून पाझरल्याने भिंत कोसळून दुर्घटना घडली.

घटना घडली त्या वेळी रस्त्यावरील वाहतूक आणि नागरिकांची वर्दळ कमी होती, ज्यामुळे कोणतीही जीवितहानी झालीलेली नाही. मात्र, भिंत कोसळल्याने सिद्धार्थ बोर्डिंगच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे.


Recent Comments