Belagavi

रस्त्याकडेला उभारलेल्या कारवर कोसळले झाड

Share

बेळगाव मधील हनुमान नगर परिसरातील प्रेस कॉलनीमध्ये आज सकाळी रस्त्याकडेला पार्क केलेल्या एका नवीन कारवर झाड उन्मळून पडल्याने कारचे नुकसान झाले आहे.

हनुमान नगर अंतर्गत येणाऱ्या कुवेम्पू नगर प्रेस कॉलनीमध्ये सोमवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली. रस्त्याकडेला उभारण्यात आलेल्या नव्या कोऱ्या कार वर हे झाड कोसळल्याने कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

झाड कोसळले त्या वेळी कारमध्ये तसेच या परिसरात कोणीही नसल्याने सुदैवाने जीवित हानी टळली. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

सध्या बेळगाव शहरात ठिकठिकाणी झाडे आणि त्यांच्या फांद्या तुटून पडण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: