Belagavi

२४ वर्षे देशसेवा बजावून निवृत्त झालेल्या जवानाचे बेळगावात स्वागत

Share

भारतीय सैन्यात २४ वर्षे सेवा बजावून निवृत्त झालेले बेळगावचे सुपुत्र हवालदार बसवराज शिवगुंडप्पा कुंदरगी यांचे रामतीर्थ नगर येथे स्वागत करण्यात आले. सुरेश यादव फाउंडेशन आणि स्थानिक रहिवाशांच्या वतीने रविवारी या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.


कारंजीमठाचे पूज्य श्री गुरुसिद्ध महास्वामीजी यांच्या उपस्थितीत आणि निमंत्रितांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. तत्पूर्वी, हवालदार बसवराज कुंदरगी यांची उघड्या वाहनातून परिसरातील मुख्य रस्त्यांवरून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी स्थानिक नागरिक आणि युवकांनी देशभक्तीपर घोषणा देत त्यांचे स्वागत केले.


याप्रसंगी सत्कार स्वीकारल्यानंतर बोलताना हवालदार बसवराज कुंदरगी यांनी, देशाच्या सीमेवर सेवा करण्याची संधी मिळणे हा मोठा सन्मान असल्याचे सांगत तरुण पिढीने देशसेवेसाठी सैन्यात दाखल व्हावे, असे आवाहन केले. या सोहळ्याला सुरेश यादव यांच्यासह स्थानिक संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

Tags: