Belagavi

मुसळधार पावसात झाड कोसळून कारचे नुकसान

Share

बेळगाव शहरात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. सोमवारच्या सुमारास भाग्यनगर येथील ३ र्‍या क्रॉसवर एक महाकाय झाड रस्त्याकडेला पार्क केलेल्या कारवर अचानक कोसळले.


सततच्या पावसामुळे झाडाची मुळे सैल झाल्याने ही दुर्घटना घडली. सुदैवाने घटना घडली तेव्हा कारमध्ये कोणीही नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे, मात्र कारचे प्रचंड नुकसान झाले आहे. झाड पडताना बाजूचे विजेचे खांब आणि ताराही तुटून खाली पडल्याने भाग्यनगर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.


दुर्घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि हेस्कॉम (HESCOM) च्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावरील झाड बाजूला करून आणि विजेच्या तारा सुरक्षित करून वाहतूक पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. ही घटना टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

Tags: