कर्नाटक सरकारच्या प्रौढ शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी म्हणून सेवा बजावून नुकत्याच सेवानिवृत्त झालेल्या ए. एम. जयश्री यांचा बेळगाव येथील राणी चन्नम्मा नगर नियमित योग वर्गाच्या वतीने न्यू उदय भवन येथे सत्कार करण्यात आला.


व्याख्यात्या, महाविद्यालयाच्या प्राचार्या आणि शिक्षणाधिकारी म्हणून एकूण ३५ वर्षांची प्रदीर्घ शासकीय सेवा करून त्या ३० जून २०२६ रोजी सेवानिवृत्त झाल्या. मुख्य योगगुरू अरुण पुणेकर, सुरेश कल्याणशेट्टी आणि सोमनाथ मुगळी यांनी त्यांचा यथोचित सन्मान केला.


या प्रसंगी जयश्री यांच्या प्रदीर्घ सेवेचे, योग साधनेचे तसेच लेखिका आणि निवेदिका म्हणून त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांचे मान्यवरांनी कौतुक केले. या सत्काराला उत्तर देताना जयश्री यांनी योगगुरूंचा सन्मान केला. शिल्पा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केलेल्या या कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली.



Recent Comments