सीमाभागातील बेळगाव शहरात भारताच्या विविधतेचे दर्शन घडवणारा एक वैशिष्ट्यपूर्ण लोकसंगीत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली येत्या ५ जुलै रोजी हा भव्य कार्यक्रम संपन्न होणार आहे.

टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो परिसरात असलेल्या डॉ. प्रसन्नकुमार ज्येष्ठ नागरिक मनोरंजन केंद्राच्या खुल्या नाट्यगृहात रविवार, ५ जुलै २०२६ रोजी संध्याकाळी ५:३० वाजता ‘भारत की लोकधारा’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आमदार अभय पाटील यांच्या विशेष संकल्पनेतून होणाऱ्या या महोत्सवात मराठी, कन्नड, हिंदी, तेलगू, तमिळ, बंगाली, पंजाबी आणि गुजरातीसह देशातील प्रमुख भाषांमधील लोकप्रिय लोकगीते व पारंपरिक नृत्यांचे सादरीकरण केले जाईल.



Recent Comments