Belagavi

बेळगाव मनपाची प्लास्टिक विरोधी मोहीम

Share

बेळगाव शहरात प्रतिबंधित सिंगल युज प्लास्टिकचा बेकायदेशीर वापर करणाऱ्या दुकानदारांवर आणि हॉटेल्सवर महापालिका अधिकाऱ्यांनी अचानक धाडी टाकून एकाच दिवसात ८०,००० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार, पर्यावरण विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता हनुमंत कलादगी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शहरातील विविध मुख्य बाजारपेठांमध्ये तपासणी मोहीम राबवली.

ही कारवाई शहरातील बुरुड गल्ली, रविवार पेठ आणि बॉक्साईट रस्त्यावरील प्रमुख हॉटेल्समध्ये करण्यात आली. या मोहिमे दरम्यान मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले असून, दोषींवर जागेवरच दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यापुढे प्लास्टिकचा वापर आढळल्यास कडक कायदेशीर पावले उचलण्यात येतील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Tags: