बेळगाव येथील शिवबसवनगरमधील कारंजीमठाच्या शिवानुभव मंडपात ६ जुलै रोजी ३०१ व्या शिवानुभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे सान्निध्य पूज्य श्री म.नि.प्र. गुरुसिद्ध महास्वामी भूषवणार आहेत. या सोहळ्यात कर्नाटक साहित्य अकादमीच्या सदस्या डॉ. मैत्रेयणी गदिगेप्पगौडर ‘शरण साहित्यातील मानवता धर्म’ या विषयावर मुख्य व्याख्यान सादर करतील.

या प्रसंगी संगीत आणि इतर क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉ. सुनिता पाटील, डॉ. दुर्गा नाडकर्णी, सुजाता कन्नेष, नैना गिरीगौडर आणि सहना बोगार या पाच महिला साधकांचा मठाच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात श्री कारंजीमठाच्या कुमारेश्वर संगीत पाठशाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रार्थनेने होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.


Recent Comments