Chikkodi

कोरड्या पडलेल्या कृष्णा नदी पात्रात अखेर सुरु झाली पाण्याची आवक

Share

गेल्या महिनाभरापासून पूर्णपणे कोरड्या पडलेल्या कृष्णा नदीत अखेर नवीन पाणी दाखल झाले आहे. यामुळे भीषण पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या नदीकाठच्या गावांमधील नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कृष्णा नदी आटल्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनला होता, तसेच हातात आलेली पिके डोळ्यांदेखत वाळून जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले होते.

आता नदीत पाण्याचा प्रवाह सुरू झाल्यामुळे कल्लोळ, येडूर, मांजरी, अंकली, चांदूर, इंगळी, बावनसौंदत्ती आणि दिग्गेवाडी यासह विविध गावांमध्ये नदी पुन्हा प्रवाहित झाली आहे. महाराष्ट्रातील राजापूर बंधाऱ्यातून कृष्णा नदीत पाणी सोडण्यात आल्याची माहिती असून, यामुळे सीमाभागातील गावांची पाण्याची अडचण दूर झाली आहे. नदीला पाणी आल्याने शेतकरी आणि पशुपालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

डी. के. उप्पार, इन न्यूज, चिक्कोडी

Tags: