Uncategorized

खानापुरात सहकार सप्ताहाचा उत्साह

Share

केन्द्रीय सहकार मंत्रालयाचा पाचवा वर्धापन दिन आणि सहकार सप्ताहाचे औचित्य साधून खानापूर येथील चौराशीदेवी सौहार्द सोसायटीच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, असा संदेश या पर्यावरण जागृती मोहिमेतून देण्यात आला.

सोसायटीच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन सौहार्द विकास अधिकारी विनोद मराठा यांच्या हस्ते करण्यात आले.

झाडांची संख्या घटत असल्याने अलीकडच्या काळात निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. वेळेवर पाऊस पडण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ किमान एक झाड लावून त्याची जबाबदारीने जोपासना करावी, असे आवाहन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. डी. ई. नाडगोडा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. तसेच, सोसायटीच्या आवारात लावलेली ही झाडे जगवण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांनी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. या प्रसंगी उपाध्यक्ष शिवाजी देसूरकर, संचालक विश्वास देसाई, व्यवस्थापक काकतकर यांच्यासह सोसायटीचे सदस्य आणि कर्मचारी उपस्थित होते.

Tags: