Belagavi

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या; आरोपी पतीला अथणी पोलिसांकडून अटक

Share

बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

अथणी तालुक्यातील नंदगाव येथील श्री अवजीकर मठ परिसरात ही घटना घडली आहे. शोभा परगोंडा सारवाड (वय ३५) असे मृत महिलेचे नाव आहे. आरोपी पती परगोंडा संगप्पा सारवाड हा गेल्या चार वर्षांपासून पत्नीच्या चारित्र्यावर विनाकारण संशय घेत होता. अनेकवेळा ज्येष्ठांनी समजूत काढूनही त्याच्यात काहीच सुधारणा झाली नाही. अखेर २८ जून २०२६ रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घरात झोपलेल्या पत्नीच्या गळ्यावर आणि हातावर त्याने कुऱ्हाडीने बेछूट वार करून तिची हत्या केली.

या घटनेप्रकरणी मृत शोभा यांचे बंधू महांतेश गुरप्पा पाटील यांनी अथणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अथणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी पतीला तातडीने अटक केली असल्याची माहिती एसपी के. रामराजन यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

Tags: