विजापूर शहरात मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान बॅन्जोच्या तालावर नाचताना झालेल्या किरकोळ वादातून पिता-पुत्रावर चाकू हल्ला झाल्याची घटना शुक्रवार रात्री अब्दुल रझाक दर्ग्याजवळ घडली. या हल्ल्यात दोघे जण जखमी झाले आहेत.

लालसाब नंद्याळ आणि त्यांचा मुलगा अब्दुल्ला नंद्याळ यांच्यावर चार संशयितांनी हल्ला केला. संशयितांनी चाकूने हात आणि पाठीवर वार केले, तसेच बॅटने मारहाण करून ते घटनास्थळावरून पसार झाले. स्थानिक नागरिकांनी गंभीर जखमी झालेल्या पिता-पुत्राला तातडीने विजापूर जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच गांधीचौक पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, फरार झालेल्या चारही संशयितांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.


Recent Comments