भारत पोलिओमुक्त होऊन १५ वर्षे झाली असली, तरी शेजारील देशांमधील पोलिओच्या रुग्णांमुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रविवारी, २८ जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.

बेळगाव जिल्ह्यात ० ते ५ वर्षे वयोगटातील एकूण ४,७१,०४१ बालकांना पोलिओ डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. आय. पी. गडद यांनी दिली. मोहिमेच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील २,३३१ बूथवर लस दिली जाईल. त्यानंतर पुढील २ ते ३ दिवस ९,५१४ लसीकरण कार्यकर्ते आणि ६१८ पर्यवेक्षकांचे पथक घरोघरी भेट देऊन एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेणार आहे.

विशेषतः विटाभट्ट्या, बांधकाम क्षेत्रे, रेल्वे स्थानके आणि झोपडपट्ट्यांमधील बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी ४९ फिरती (मोबाईल) आणि ७४ ट्रान्झिट पथके तैनात करण्यात आली आहेत. जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांची समन्वय बैठक झाली असून, मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे.


Recent Comments