Belagavi

बेळगावात ५७ लाख रुपयांपेक्षा अधिक मूल्याचे अमली पदार्थ नष्ट

Share

बेळगाव पोलिस आयुक्तालय क्षेत्रात विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत जप्त करण्यात आलेले लाखो रुपयांचे अमली पदार्थ ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात आले आहेत.

एनडीपीएस कायद्यांतर्गत जप्त केलेल्या या गांजा, हेरॉईन आणि हशिशची नियमांनुसार विल्हेवाट लावण्यात आली. बेळगाव शहर आयुक्तालयातील विविध ठाण्यांच्या अंतर्गत अंमली पदार्थांची अवैध वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांकडून जप्त करण्यात आलेला हा साठा २५ जून २०२६ रोजी सकाळी साडेअकरा वाजता नष्ट करण्यात आला. यामध्ये २४ किलो गांजा, १२० ग्रॅम हेरॉईन आणि १३ किलो हशिश अशा एकूण ५७ लाख ७८ हजार ९०० रुपये अंदाजे किमतीच्या अमली पदार्थांचा समावेश होता.

‘ड्रग्ज डिस्पोजल कमिटी’, गुन्हे व वाहतूक पोलिस उपआयुक्त आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. सवदत्ती तालुक्यातील हारुगोप्प गावातील ‘बेळगाव ग्रीन एन्व्हायरनमेंट मॅनेजमेंट’ कारखान्यात वैज्ञानिक पद्धतीने या अमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली आहे.

Tags: