एका पॉडकास्ट कार्यक्रमात मोहम्मद पैगंबर (स.अ.) यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ बेळगावातील विविध मुस्लिम संघटनांच्या वतीने आज बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव यांना निवेदन सादर करण्यात आले.

नाझिया इलाही खान नावाच्या महिलेने पैगंबरांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि अपमानकारक विधाने केली असून, यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर, आज बेळगावातील विविध मुस्लिम संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. संबंधित महिलेवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि तिच्या अशा कृत्यांवर निर्बंध घालण्यात यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
याप्रसंगी अशरफी फाउंडेशनचे मुईन दफेदार, उर्दू घर समितीचे शरीफ अहमद शरीफ, गरीब नवाज समितीचे सय्यद सांबरेकर, टिपू सेनेचे नवीद जमादार, खतीब-ए-आझम फाउंडेशनचे शब्बीर देसाई यांच्यासह अब्दुल काझी, मुजाहिद देशनूर, गुलजार मिन्यार, इक्बाल अहमद जकाती आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments