चिक्कोडी तालुक्यातील एकसंबा येथील दूधगंगा नदीकाठावर असलेल्या ऐतिहासिक श्री कर्लहोंड लिंगेश्वर मंदिरात लोककल्याण आणि उत्तम पावसासाठी विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


श्री कर्लहोंड लिंगेश्वर सेवा संघाच्या वतीने आयोजित या धार्मिक उत्सवात राज्याची प्रगती, उत्तम पाऊस-पाणी आणि शेतकरी बांधवांच्या समृद्धीसाठी विशेष होमहवन व महापूजा करण्यात आली.

मंदिर परिसरात परंपरेनुसार पूजार्यांनी सर्व धार्मिक विधी पूर्ण केले. एकूण ५१ दांपत्यांनी एकाच वेळी या होमहवन कार्यक्रमात सहभाग घेतला. यानंतर श्री कर्लहोंड लिंगेश्वर स्वामींना महापूजा आणि मंगलारती करण्यात आली. या धार्मिक विधीनंतर उपस्थित हजारो भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली.
या प्रसंगी श्री कर्लहोंड लिंगेश्वर सेवा संघाचे अध्यक्ष आशिष हुक्केरी, पुंडलिक हिटने, सुरेंद्र कबाडे, रवी हिटन्ने, सचिन माने, केदारी गिड्ड, बाबू बाकळे, पुंडलिक सात्त्वर, शंकर मेकलक्की, सुधाकर मोपगार, मळकारी डवणे, गंगाधर हिरेमठ, बाळू महंत गुरु हिरेमठ आणि संघाचे सचिव रमेश कम्मार यांच्यासह गावातील मान्यवर उपस्थित होते, अशी माहिती श्री कर्लहोंड लिंगेश्वर सेवा संघाच्या वतीने देण्यात आली.


Recent Comments