विविध राज्यांतून कर्नाटकात आणलेल्या सुमारे ५४.५४ लाख मेट्रिक टन अन्नधान्याची सुरक्षित वाहतूक आणि साठवणुकीतील नुकसान रोखल्याबद्दल भारतीय अन्न महामंडळाच्या कर्नाटक विभागाचे कौतुक करण्यात आले आहे.

शुक्रवारी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अन्नधान्याची साठवणूक, वाहतूक आणि गुणवत्ता राखण्यात कर्नाटक विभागाने केंद्रीय अन्न मंत्रालयाचे निकष योग्य पद्धतीने पाळले असून बेळगाव जिल्ह्यातील बेनकनहळ्ळी येथील एफसीआय डेपोला दक्षिण भारतातील सर्वोत्तम डेपोचा पुरस्कार मिळाल्याचे त्यांनी सांगितले. राज्यस्तरीय सल्लागार समितीचे अध्यक्ष आणि माजी राज्यसभा खासदार ईरण्णा कडाडी यांनी या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले.

याच वेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका करताना, केंद्र सरकारच्या मदतीने दिल्या जाणाऱ्या किमान आधारभूत किमतीत शेतकऱ्यांचे धान्य खरेदी करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला. राज्यात आतापर्यंत केवळ २ लाख ५७ हजार टन धान्याचीच खरेदी झाली आहे, असे ते म्हणाले.
तसेच मंत्री प्रियांक खर्गे यांच्या विधानाचा समाचार घेताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा संविधानाचे पालन करणारा संघ असून खर्गे विनाकारण हा विषय उद्देशपूर्वक उकरून काढत असल्याची टीका कडाडी यांनी केली. या पत्रकार परिषदेला महेश्वरप्पा, श्रीकांत कौजलगी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments