Belagavi

इडीच्या कारवाईनंतर वाय. मंजुनाथ तातडीने बेळगावात दाखल

Share

इडीच्या छाप्यांनंतर वाय. मंजुनाथ हे बेळगावात दाखल झाले असून त्यांनी आपल्या निवासस्थानी पोहोचताच तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत.

इडीच्या कारवाईमुळे राजकीय आणि व्यावसायिक वर्तुळात चर्चा सुरू असतानाच, त्यांनी पुढील कायदेशीर लढाईसाठी सल्लामसलत सुरू केली आहे. बेळगावातील टीव्ही सेंटर परिसरातील आपल्या निवासस्थानी येताच मंजुनाथ यांनी शहरातले प्रसिद्ध लेखापरीक्षक सीए पी. जी. गाळी यांना तातडीने बोलावून घेतले. या दोन्ही प्रमुखांमध्ये सुमारे तीन तास सखोल चर्चा झाली असून इडीने जप्त केलेली कागदपत्रे, आर्थिक व्यवहार आणि आगामी चौकशीला सामोरे जाण्याची रणनीती यावर खल झाला.

भविष्यातील कायदेशीर संकटातून मार्ग काढण्यासाठी आणि इडीच्या नोटिसीला योग्य उत्तर देण्यासाठी हा महत्त्वपूर्ण सल्ला घेण्यात आल्याचे पी. जी. गाळी यांनी म्हटले. या सुदीर्घ सभेमुळे बेळगावच्या राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रात सध्या विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

Tags: