बेळगाव शहरातील कुमारस्वामी ले-आऊट परिसरामध्ये चोऱ्यांचे सत्र सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बुधवारी रात्री पुन्हा एकदा घरफोडीचा प्रयत्न झाला असून, चोरट्याची ही हालचाल सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.


एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कुमारस्वामी ले-आऊटमध्ये गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सातत्याने चोऱ्यांचे प्रयत्न होत आहेत. परिसरात आतापर्यंत ४ ते ५ वेळा घरफोडीचे प्रयत्न झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. बुधवारी रात्री चोरीच्या उद्देशाने आलेल्या एका चोरट्याचे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे. चोरते रात्रीच्या वेळी बंद घरांना लक्ष्य करत असल्याने, पोलिसांनी तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

परिसरात चोऱ्यांचे प्रयत्न वाढत असल्याने रात्रीच्या वेळी बाहेर पडणे किंवा शांतपणे झोपणेही कठीण झाले आहे. शेवटच्या भागात असलेल्या घरांना सुरक्षा पुरवण्यात यावी, असे एका नागरिकाने म्हटले आहे. तर, गेल्या दोन महिन्यांत या भागात अनेकदा चोरते येऊन गेले असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांनी दिली आहे.


Recent Comments