Belagavi

भारतीय व्हॉलीबॉल संघाचे मिरजकर सहायक प्रशिक्षक

Share

चीनमधील हायकोऊ येथे १२ ते १८ जुलैदरम्यान होणाऱ्या एव्हीसी बॉईज यू-१८ व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप साठी बेळगावचे व्हॉलीबॉल प्रशिक्षक नामदेव मिरजकर यांची भारतीय व्हॉलीबॉल संघाच्या सहायक प्रशिक्षकपदी निवड झाली आहे.
२०२६

जिल्हा युवा सबलीकरण व क्रीडा खात्यात व्हॉलीबॉल प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेले मिरजकर यांची ही निवड भुवनेश्वर (ओडिशा) येथील केआयआयटी विद्यापीठातील प्रशिक्षण शिबिरात करण्यात आली. हे शिबिर
२६ जून ते १० जुलैदरम्यान आयोजित करण्यात आले आहे. भारतीय संघाच्या प्रशिक्षक मंडळात मुख्य प्रशिक्षक म्हणून टॉम जोसेफ, सहायक प्रशिक्षक म्हणून नामदेव मिरजकर, तंदुरुस्ली प्रशिक्षक म्हणून रमेश तारीख आणि फिजिओथेरपिस्ट म्हणून डॉ. आर. अनू सिंग यांची निवड करण्यात आली आहे.

निवड समितीमध्ये टॉम जोसेफ, नवनीत कटारिया, जगदीश सिंग, निर्मल तोवर, चेपूर आणि श्रीदेवी यांचा समावेश होता. प्रशिक्षण शिबिरातील अधिकारी व निवड समिती सदस्यांना नियोजित वेळेत उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नामदेव मिरजकर हे जिल्हा युवा सबलीकरण व क्रीडा खात्याचे प्रशिक्षक असून, क्रीडा भारती बेळगावचे सदस्यही आहेत.

Tags: