बेळगाव तालुक्यातील अलतगा येथील रामेश्वर मंदिर देवस्थानच्या जमिनीवर भूमाफियांकडून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी प्रशासनाकडे धाव घेत चौकशीची आणि न्यायाची मागणी केली आहे.

अलतगा येथील सर्वे क्रमांक ७ मधील ४ एकर ५ गुंठे जमीन रामेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या मालकीची आहे. १९५७ च्या नोंदीनुसार ही जमीन श्री गोविंद यांच्या नावे असून त्यावर रामेश्वर मंदिराचा अधिकार आहे. या जमिनीबाबत पूर्वी भूमी न्याय मंडळाने दिलेल्या आदेशानुसार के. एल. ट्रिब्युनलने अंतिम निर्णय दिला होता.

असे असतानाही काही भूमाफिया कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय या जमिनीवर हक्क सांगत असून ग्रामस्थांना सातत्याने त्रास देत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून रामेश्वर मंदिराची जमीन सुरक्षित करावी आणि ग्रामस्थांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी अलतगा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.


Recent Comments