बेळगाव जिल्ह्यातील नागरिकांसाठी आधारशी संबंधित सेवा आता अधिक सुलभ आणि जलद गतीने उपलब्ध होणार आहेत. शहरात नव्याने सुरू करण्यात आलेल्या अत्याधुनिक आधार सेवा केंद्राचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते अधिकृत उद्घाटन करण्यात आले.

बेळगावचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी मोहम्मद रोशन यांनी यूआयडीएआयच्या उपसंचालिका सिरी आनंद व्ही. यांच्या उपस्थितीत या नवीन आधार सेवा केंद्राचे उद्घाटन केले. उद्घाटनप्रसंगी सिरी आनंद यांनी केंद्रातील नागरिक-स्नेही सुविधांची माहिती दिली, तर यूआयडीएआयच्या सहाय्यक व्यवस्थापकांनी ऑनलाईन अपॉइंटमेंट पोर्टल बुकिंग आणि नवीन ॲप्लिकेशनच्या वैशिष्ट्यांचे सादरीकरण केले.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी यूआयडीएआयच्या प्रयत्नांचे कौतुक करत, नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यावर भर देण्याच्या सूचना केल्या. तसेच या सुविधेबाबत माध्यमांद्वारे जनजागृती करण्याचे निर्देश दिले. कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच थेट नोंदणी आणि बायोमेट्रिक अपडेट प्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
या प्रसंगी यूआयडीएआयचे व्यवस्थापक मोहम्मद मुसाब, क्लस्टर मॅनेजर श्याम सुंदर, बीएलएस इंटरनॅशनलच्या स्वाती कोटबागी आणि जिल्हा आधार सल्लागार विनोद यांच्यासह इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments