Belagavi

बेळगावात ‘एआयडीएसओ’चे आंदोलन; ‘नीट’ घोटाळ्याचा निषेध

Share

‘नीट’ (NEET) परीक्षेतील गैरव्यवहार आणि प्रश्नपत्रिका फुटीच्या निषेधार्थ बेळगावात ‘एआयडीएसओ’ विद्यार्थी संघटनेने भव्य मोर्चा काढला. शहरातील मुख्य मार्गावरून निघालेल्या या मोर्चाने राणी चन्नम्मा चौकात केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली.

आंदोलक नेत्यांनी देशातील शिक्षण व्यवस्थेवर तीव्र चिंता व्यक्त केली. ‘एनटीए’ने प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे परीक्षा रद्द केली. सरकारच्या या भोंगळ कारभारामुळे देशभरातील २७ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

परीक्षेची तयारी करणाऱ्या १९ हून अधिक विद्यार्थ्यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या आत्महत्या नसून सरकारने केलेले खून आहेत, असा संतप्त आरोप आंदोलकांनी केला.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात एआयडीएसओ संघटनेचे पदाधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: