बेळगाव जिल्ह्यात सध्या पिण्याच्या पाण्यासाठी तीव्र टंचाई निर्माण झाली असतानाच, यडियुरप्पा मार्गावर प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हजारो लीटर पिण्याचे पाणी रस्त्यावर वाहून गेल्याची घटना समोर आली आहे.


येडियुरप्पा मार्गावरील मुख्य पाईपलाईन मधील हवा काढण्याचे काम सुरू असताना कोणतीही पूर्वदक्षता न घेतल्याने हा सर्व प्रकार घडला. जिल्ह्यात आधीच पावसाने ओढ दिल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी मैलोन्मैल भटकावे लागत आहे. अशा परिस्थितीत डोळ्यांदेखत पाण्याचा अपव्यय झाल्याने स्थानिक रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने या ठिकाणी धाव घेऊन पाणी वाया जाण्यापासून रोखावे, तसेच बेजबाबदारपणे काम करणाऱ्या संबंधित कंपनीवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.


Recent Comments