सरकारने सुरू केलेल्या शाळाच्या माध्यान्ह आहार योजनेंतर्गत देण्यात येणार्या केळी व अंडीचा दर दुप्पट झाला आहे.त्यामुळे शिक्षकाना अनेक समस्येना सामोरी जावे लागत आहे.
तेव्हा केळी व अंडीच्या वाढत्या दराबाबत विचारविनमय व्हावा. व दर वाढवुन द्यावा,अथवा सरकारने पुरवठा करावा.यामागणीसाठी खानापूर तालुका शिक्षक संघटनेच्यावतीने तालुका अक्षरदासोह अधिकारी विनोद जकाती याना निवेदन देऊन मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे.की , सध्या केळी व अंडी यां च्या दरात दुप्पटीने वाढ झाली
आहे. सरकार केळ्याला तीन रूपये तर अंड्याला साडे पाच रूपये अनुदान देत आहे.
मात्र आजच्या परिस्थित एका केळ्याची किमत सहा रूपये तर एका अंड्याची किमत सात रूपये दराने खरेदी करावी लागत आहे.त्यामुळे शिक्षकाना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. यासाठी सरकारने केळी व अंड्याचा दर वाढवुन द्यावा. अन्यथा सरकारने पुरवठा करावा.अशी मागणी केली आहे.

खानापूर तालुका हा अति जंगलाने व्यापलेला तालुका आहे.तेव्हा जंगल भागातील शाळाना पावसात वाहने जाण्यास रस्त्याची आडचण असते.तेव्हा पावसाळ्यापूर्वी रेशन पाठवा.तसेच गॅसचा पुरवठा तालुक्यात वेळेत करावा.अशी मागणी शिक्षक संघटनेने केली.
यावेळी खानापूर तालुका अक्षरदासोह अधिकारी विनोद जकाती यानी निवेदनाचा स्विकार करून सरकारकडे पाठवुन समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करतो.असे आश्वासन दिले.
निवेदन देताना खानापूर तालुका शिक्षक संघटना उपाध्यक्ष कृष्णा कौंदलकर,प्रधान कार्यदर्शी बी बी चापगावकर,माजी प्रधान कार्यदर्शी पिराजी पाखरे, माजी उपाध्याक्ष सतीश हळदणकर,संचालक रमेश कवळेकर,महेश हेब्बाळकर,एनजीओ संचालक बापू दळवी,आय बी सनदी,सौ.रामेश्वरी पाटील ,तसेच मुख्याध्यापक व शेकडो शिक्षक उपस्थित होते.


Recent Comments