Belagavi

गो रक्षकांच्या सुटकेसाठी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने

Share

मध्य प्रदेशात गो रक्षकांवर करण्यात आलेल्या कायदेशीर कारवाईच्या निषेधार्थ बेळगावात कामधेनू अय्यप्पा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जात प्रशासनामार्फत सरकारला निवेदन सादर केले. या वेळी कार्यकर्त्यांनी गो रक्षकांच्या सुटकेसाठी जोरदार मागणी केली.

मध्य प्रदेशात गेल्या १५ दिवसांपूर्वी १४ गो रक्षकांवर करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध करत कामधेनू अय्यप्पा सेवा संघातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देऊन निवेदन देण्यात आले. सातत्याने गो रक्षकांना लक्ष्य करून गुन्हे दाखल केले जात असल्याबद्दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, ताब्यात घेतलेल्या १४ गो रक्षकांना पुढील पाच ते सहा दिवसांत कायदेशीररित्या जामीन देऊन त्यांची मुक्तता करावी, अशी मागणी केली. या मागणीची दखल न घेतल्यास आगामी दिवसांत बेळगाव जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

या प्रसंगी प्रमुख गो रक्षक नीलेश, प्रकाश लाडवा, आनंद नवले, नागराज कमलापूर, किरण, महेश आणि हितेश यांच्यासह कामधेनू अय्यप्पा सेवा संघाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: