बेळगाव शहरातील नाथपै सर्कलनजीक ट्रक आणि बाईक दरम्यान झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे.

मंगळवारी गणेश नामक युवक आपल्या सहकाऱ्यासह बाईकवरून जात असताना नाथपै वर्तुळाजवळ भरधाव ट्रकने त्यांच्या बाईकला जोरदार धडक दिली. या धडकेत गणेशचा घटनास्थळावरच मृत्यू झाला, तर बाईकच्या पाठीमागे बसलेला दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी स्थानिक खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघात घडताच ट्रक चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला आहे. याप्रकरणी बेळगाव दक्षिण ट्रॅफिक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


Recent Comments