बेळगाव शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून या समस्येवर कायमसूर्पी आणि पर्यायी तोडगा काढण्यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करत आहेत. दरम्यान, शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रेल्वे एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या उभारणीबाबतही महत्त्वाची चर्चा झाली असल्याची माहिती आमदार अभय पाटील यांनी दिली.

बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील यांनी महापौर, उपमहापौर आणि नगरसेवकांच्या संयुक्त पथकासह राकसकोप जलाशयाला भेट देऊन पाण्याच्या सद्यस्थितीची पाहणी केली. शहरात पाणीटंचाईची समस्या गंभीर असल्याचे मान्य करत त्यांनी तात्काळ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले जात असल्याचे सांगितले. तसेच नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शहरात ५३ नवीन कूपनलिका खोदण्याचा विचार असून याद्वारे पाणीटंचाई दूर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

पाण्याच्या समस्येसोबतच बेळगावमधील प्रलंबित ‘रेल्वे एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या उभारणीबाबत आमदारांनी महत्त्वाची माहिती दिली. या मोठ्या प्रकल्पासंदर्भात खासदार जगदीश शेट्टर यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली असून लवकरच नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन प्रकल्पाच्या मंजुरीसाठी आवश्यक पावले उचलली जातील, असा विश्वास आमदार अभय पाटील यांनी व्यक्त केला.


Recent Comments